मा. श्री. जयंत पाटील साहेब

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष पक्षकार्याचा आढावा, सभा किंवा बैठका असो. जिल्ह्यातील पदाधिकारी, जनतेशी व निष्ठावान कार्यकर्त्यासोबत गाठीभेटी ठरलेल्या असतात. त्यात आवर्जून भेट होते ती युवा तरुण नेतृत्वाची म्हणजेच अतिश बारणे यांची. खास गप्पा व विविध विषयांवर सांगोपांग चर्चा नेहमी होत असते. आत्तापर्यंत बऱ्याच वेळा बारणे यांच्या सोबत विविध विकास कामावर चर्चा करून पक्षाच्या पायाभरणीविषयी मोशीमध्ये बैठका घेतल्या आहेत. अतिश यांच्या कामाची पद्धत भावते. तळागाळातील लोकांसोबत कसे काम करायला हवे हे अतिशला माहित आहे. हेच समाजकारणाचे सूत्र त्याने पाळले आहे. जमिनीवर पाय रोवून काम करण्याची त्याची पद्धत आहे. कोणतेही सामाजिक काम तो मनापासून करतो. कोणत्याही कामांत तो मागे हटत नाही. त्याला माझ्याकडून यशस्वी वाटचालीसाठी कायम पाठिंबा व मनस्वी शुभेच्छा आहेत.