मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब
महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात गेल्या साडे पाच दशकांपासून आदरणीय शरद पवार या नावाचा दबदबा आहे. तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारे, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेले दूरदर्शी लोकनेते म्हणजे साहेब. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही तरुणांना लाजवेल इतकी कामाची प्रचंड ऊर्जा आणि उत्साह त्यांच्यात दिसून येतो. कृषी, उद्योग, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्राची सखोल माहिती त्यांना आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे आणि हा विचार सर्वदूर पोहोचवायचा असेल तर त्यासाठी सदैव भरीव कार्य करावे लागणार हे त्यांना ज्ञात आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या या महाराष्ट्राला साहेबांसारखा उदात्त आणि सामाजिक दृष्टीकोन असणारा नेता लाभला ही अभिमानास्पद बाब आहे. शेतकरी, कामगार, मजूर, मध्यमवर्गीय, उद्योजक व सर्व पक्षातील राजकीय व्यक्तींना साहेब आपले वाटतात. साहेबांच्या समर्थ नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली एकवीस वर्ष सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनांवर दृढ विश्वास ठेवून काम करत आहे.