























काल वाढदिवस खूपच संस्मरणीय ठरला. अनेक मान्यवरांनी जनसंपर्क कार्यालयात तसेच ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून, भेट देऊन अभिष्टचिंतनाचा वर्षाव केला. दिवसाची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने झाली. प्रभागातील महिलांनी औक्षण केले आणि ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले.
वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर आणि पोलीस, ट्राफिक पोलीस, शालेय विद्यार्थी, स्वच्छता कामगारांसाठी उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरले आणि सर्वांच्या गाठीभेटी तसेच शुभेच्छांच्या वर्षावाने दिवस आणखी संस्मरणीय झाला.
सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादाने मी खूप भारावून गेलो आहे. आपल्या या सदिच्छा आणि आशीर्वादांनी माझ्या पाठीशी कायम राहावेत, हीच माझी अपेक्षा आहे.
Ajit Pawar Parth Ajit Pawar
0 Comments