शास्तीकराच्या प्रश्नावर आवाज उठवला आम्ही वेळोवेळी, पार्थ दादांच्या साथीने केला पाठपुरावा वेळोवेळी..! शास्तीकर विलंब शुल्क शंभर टक्के माफ करावे. मिळकत करामध्ये 50 टक्के ते 75 टक्के अशी सवलत दिली जावी अशी पिंपरी चिंचवडकरांची मागणी होती. मात्र शास्तीकर थकबाकी वगळून मूळ कर स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे नागरिकांची थकबाकी वाढली. अनेक वर्षांपासून नागरिक मूळ कर भरण्यास तयार होते. मात्र मनपा स्वीकार करत नसल्यामुळे आता शास्तीसह मूळ कर भरणे आवश्यक झाले आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बदलली. त्यामुळे शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी पार्थ पवार यांच्याकडे केली.