मा.श्री.अमोल कोल्हे साहेब

कोरोना काळात अतिशने खूप मोठी कामगिरी केली. त्या काळात प्रत्येक क्षण महत्वाचा होता. अशा बिकट परिस्थितीत चार रुग्णवाहिका मोफत उपलब्ध केल्या. रुग्णांसाठी रुग्णवाहिका हि रक्तवाहिनी आहे. त्यामुळे अशा कठीण काळात समाजाभिमुख काम करणाया अतिश सारख्या युवकांची गरज राजकारणात आहे. अतिश यांनी जनतेच्या समस्यांसाठी अनेकदा भेट घेतली आहे. इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखणासाठी अतिशची धडपड पाहिली आहे. अनेकदा विविध विषयावर चर्चा करून त्वरित तोडगा काढण्याचा त्याचा अट्टहास असतो. पर्यावरण पूरक गणेशोत्सावाचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे काम त्याने केले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी पेलणे, पक्ष आदेशानुसार ताकदीने उभे राहणे हे गुण वाखाणण्याजोगे आहेत. माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिश खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडत आहे. खूप कमी वयात त्याने उत्कृष्ट काम केले आहे. मला नेहमी त्याचा कामाचा अभिमान वाटतो.