को फ्रेंडली गणपती बाप्पा हाच आमचा संकल्प, निसर्गाची हानी टाळा, हाच एकमेव विकल्प..!
दरवर्षी इंद्रायणी पात्रात होणारे गणरायाचे विसर्जन टाळून नदी प्रदूषित होऊ नये म्हणून प्रथमच मोशी गावात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कृत्रिम विसर्जन होदाची उभारणी केली. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाल्याने प्रथमच मोशीमध्ये गणेश मंडळांना वृक्ष गजानन पर्यावरणपूरक श्रींच्या मूर्ती भेट देण्यात आल्या. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न घेता अंगणी तुळस लावण्याचे आवाहन अतिश यांनी नागरिकांना केले. औषधी तुळशीचे रोपटे या माध्यमातून सर्वांना मिळाले. शिवाय हे विसर्जन घरातूनच सर्वाना शक्य झाले. या उपक्रमास स्थानिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.