मा. श्री. अजितदादा पवार
राजकारणात शिक्षित युवकांची मोठी गरज आहे. त्यात देखील समाजासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या धाडसी तरुणांची. कायम प्रफुल्लित व आनंदित मनाने पक्ष कार्यात सहभागी होण्याची अतिशची वृत्ती मला भावते. समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतो. पक्षाच्या संघटनात्मक कामात त्याचा नेहमी सहभाग असतो. आम्ही राज्यभर फिरताना कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत असतो. जेव्हा पाया मजबूत असतो तेव्हा भिंत ढासळत नाही. ते काम नक्कीच अशा जागरूक कार्यकर्त्यामुळे होते. ते अतिशने केले आहे. असे युवा नेतृत्व राष्ट्रवादी पक्षाला लाभले आहे. अतिशचे मनापासून कौतुक आहे. अशीच झेप त्याने भविष्यात घेत राहावी. या माझ्या सदिच्छा आहेत.