@swamigovindadevGiri #maharajji 💐🙏🏻 परमपुज्य , राष्ट्रसंत स्वामी गोविंन्द देव गिरिजी महाराजकोषाध्यक्ष, आणि ट्रस्टी श्रीराम जन्मभूमि...
Read Moreमनोगत
श्री क्षेत्र देहू व आळंदी दोन्ही दिशेला असणारी तीर्थक्षेत्रे आणि पवित्र इंद्रायणीच्या काठावर वसलेले मोशी हे माझे गाव. ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या व गावातील शेती व वारकरी संप्रदायाचा वारसा जपणाऱ्या बारणे कुटुंबात जन्म झाला. ह.भ.प.श्री आनंदा बारणे यांच्यामुळे लहानपणापासून अध्यात्मिक, सांप्रदायिक बाळकडू मला मिळाले. त्याच बरोबर वडील कुस्तीसह, विविध खेळात निपुण असल्यामुळे क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राची आवड निर्माण झाली व मोठे चुलते श्री.सिताराम बारणे यांचे नेहमी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आमच्या कुटुंबातील मोठे बंधू श्री. बबनराव बारणे हे ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांच्यापासून कुटुंबाच्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात झाली. भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणात सक्रिय होण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे समाजकारण जवळून अनुभवता आले आणि नागरिकांच्या हितासाठी कार्य कसे करायचे याचा मोठा अनुभव मिळावा.
माझे शिक्षण चालू असतानाच समाजकारण आणि राजकारण याची…..
एक वेगळीच गोडी मला लागली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व अजितदादा यांच्या नेतृत्वाची वेगळीच भुरळ पडली आणि हे समाजकार्य करत असताना ते राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाच्या नेतृत्वात करायचे असा ठाम विश्वास करून राजकीय कार्याला सुरुवात केली ते आजपर्यंत करत आहे.
हे सर्व करत असताना मी बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आणि पूर्ण वेळ समाजकारणात येण्याचा निश्चय पक्का करून कामाला लागलो. शिक्षणाचे महत्व जाणून जिद्दीने शिक्षणाची कवाडे मोशीमध्ये खुली व्हावी आणि गरीब व होतकरू मुलांना शिक्षण मिळावे यासाठी ए. बी. वल्लभ स्कूल नावाची इंग्रजी माध्यम शाळा सुरु केली. हे सर्व करत असताना भाऊ अक्षय व कुटुंबाच्या साथीने बांधकाम क्षेत्रातही पाऊल ठेवले आणि समाजकारणाबरोबर व्यवसायात देखील भरगोस यश मिळाले ते सर्व पिंपरी चिंचवडच्या मायबाप माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेमुळेच. आता ध्यास घेतला आहे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा आणि माझ्या सामान्य मोशीकर नागरिकांच्या प्रगतीचा. आजपर्यंत कुठल्याही स्वार्थाशिवाय सामान्य जनतेसाठी कार्य करत आलोय आणि इथून पुढेही ते कार्य असेच अविरत चालू राहील हि खून गाठ मनाशी पक्की करून चालत आहे.
आता फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे……….!
आपलाच,
अतिश आनंदा बारणे शहरउपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रस पिं.चिं.